IMG-LOGO
राष्ट्रीय

अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का; उच्च न्यायालयाचा तत्काळ सुनावणी घेण्यास नकार

Sunday, Mar 24
IMG

अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

दिल्ली, दि. २४ : ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईविरोधात अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घेण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची याचिका फेटाळली.अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश जस्टिस मनमोहन यांच्या कोर्टाने केजरीवाल यांच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार दिला. ईडीच्या रिमांड विरोधात त्यांनी शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी तातडीची सुनावणी व्हावी, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. देशभरात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत. तर अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून सरकार चालवणार असल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, ‘आप’च्या या भूमिकेला अनेकांनी विरोध केला आहे.

Share: