IMG-LOGO
राष्ट्रीय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

Friday, Mar 22
IMG

दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने केजरीवाल यांना गुरुवारी नवव्या वेळी समन्स बजावले. केजरीवाल यांनी हे समन्सही धुडकावले आणि ते चौकशीला उपस्थित राहिले नाहीत.

दिल्ली, दि. २२ : अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. ईडीने चौकशीसाठी बजावलेले सलग नऊ समन्स केजरीवाल यांनी धुडकावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अटकेपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या घरात घुसून त्यांची दोन तासांहून अधिक वेळ चौकशी केली. दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने केजरीवाल यांना गुरुवारी नवव्या वेळी समन्स बजावले. केजरीवाल यांनी हे समन्सही धुडकावले आणि ते चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. ईडीच्या समन्सला आव्हान देणारी याचिका केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केजरीवाल यांच्या वरिष्ठ वकिलांनी गुरुवारी जारी केलेले समन्स पुढे ढकलण्याची मागणी केली. मात्र, ईडीतर्फे न्यायालयात बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी स्पष्ट केले की, समन्स पुढे ढकलण्याची वेळ संपली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजीनामा देणार नाहीत. ते तुरुंगातून दिल्ली सरकारचा कारभार चालवत राहतील, असे दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

Share: