IMG-LOGO
लोकसभा २०२४

भाजपची लोकसभेची पाचवी यादी जाहीर; वरुण गांधींना डच्चू तर कंगनाला उमेदवारी

Sunday, Apr 07
IMG

भाजपच्या वतीनं आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पाचव्या उमेदवार यादीमध्ये एकूण १११ उमेदवारांची नावं असून, त्यात कंगनाच्य़ाही नावाचाही समावेश आहे.

नवी दिल्ली, दि. २६ : भाजपने पाचव्या उमेदवारी यादीत अनेकांना धक्का दिला आहे. मनेका गांधी यांना उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरमधून पुन्हा उमेदवारी दिली असली तरी, त्यांचे पुत्र वरुण गांधींना पिलभितमधून डच्चू देण्यात आला आहे. आपल्या विधानांनी कायम वाद ओढवून घेणाऱ्या अनंतकुमार हेगडे यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारली आहे.भाजपच्या वतीनं आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पाचव्या उमेदवार यादीमध्ये एकूण १११ उमेदवारांची नावं असून, त्यात कंगनाच्य़ाही नावाचाही समावेश आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून निवडणुकीसाठी संधी देण्यात आली आहे. भाजपची ही उमेदवार यादी म्हणजे एक मोठा उलटफेर ठरत असून, त्यात वरुण गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांची नावं वगळण्यात आल्यामुळं राजकीय वर्तुळात बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री वी के सिंह यांच्या जागी गाजियाबादमधून स्थानिक नेते अतुल गर्ग यांना संधी देण्यात आली आहे. तर, बिहारच्या बक्सर येथून केंद्रीय मंत्री अतूल चौबे यांना वगळून त्या जागेवर मिथिलेश तिवारी यांना तिकीट दिलं आहे. पीलीभीत येथून भाजपनं राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या नावे उमेदवारी बहाल केली आहे. भंडारा- गोंदिया मतदार संघातून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा एकदा संधी दिली. शिवाय अशोक नेते यांनाही संधी मिळाली असून ते मागील 10 वर्षे गडचिरोली येथून खासदार राहिले आहेत.

Share: