पहिल्या बैठक मध्ये 80 टक्के फायनल झालं आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवार फायनल आहे मात्र सर्वच आम्ही लवकरच फायनल करू.
मुंबई, दि. २१ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे पुत्र अमित ठाकरे होते. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी घेतलेली ही भेट महत्वाची मानली जाते आहे. अशात आता राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचले आहेत. राज ठाकरेंनी घेतलेली ही भेट सूचक मानली जाते आहे. त्याआधी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी रात्री उशिरा गुप्त भेटही झाली.फडणवीस म्हणाले की, पहिल्या बैठक मध्ये 80 टक्के फायनल झालं आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवार फायनल आहे मात्र सर्वच आम्ही लवकरच फायनल करू. आम्ही एकाच बैठकीत ८० टक्के निर्णय केला. आता दुसऱ्या बैठकीत उरलेला २० टक्के निर्णय करू. बुधवारी रात्री अकरा वाजता राज ठाकरे हे शिवतीर्थवरून निघाले. तर त्याच वेळी देवेंद्र फडणवीस हे मुंबई विमानतळावर दाखल झाले. रात्री पावणे बाराच्या सुमारास राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. ही भेट विमानतळ ते दादर परिसरात एका ठिकाणी झाल्याचं म्हटलं जात आहे.