रायगड समुद्र किनार्यावर तीन दिवसांत आठ मृतदेह सापडले आहेत.
अलिबाग, दि. २३ मे : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्र किनार्यावर झ305 बार्ज बुडाले आहे. अद्यापही मृत कर्मचार्यांचा शोध सुरू आहे. रायगड समुद्र किनार्यावर तीन दिवसांत आठ मृतदेह सापडले आहेत. हे मृतदेह पी 305 बार्जवरील कर्मचार्यांचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलिबाग तालुक्यात शनिवारी सात, मुरूड येथे शुक्रवारी रात्री एक असे आठ मृतदेह सापडले आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे खोल समुद्रात बुडालेल्या पी 305 बार्जवरील मृतदेह असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी ओएनजीसी आणि मुंबई पोलिसांनी माहिती कळवली आहे.