बैठकीत त्यांनी १२ एप्रिल रोजी अपक्ष निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई, दि. २४ : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी मध्यस्थी करुनही विजय शिवतारे हे निवडणूक लढण्यावर ठाम असून रविवारी (दि. २४) झालेल्या बैठकीत त्यांनी १२ एप्रिल रोजी अपक्ष निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात महायुतीकडून सुनेत्रा पवार लढणार आहेत.त्यातच शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे देखील बारामतीतून लढणार आहेत.महायुतीत असून शिवतारेंनी वेगळी भूमिका घेतल्यानं एकनाथ शिंदेंनी शिवतारेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न असफळ ठरल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मी शरद पवार यांचा माणूस आहे आहे. असे बोलले जाते मात्र मला फक्त अजित पवार यांचा पराभव करायचा आहे. मी लढतोय ते जिंकण्यासाठी असे म्हणत १ तारखेला पालखी तळावर सभा घेणार आणि १२ एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणाही शिवतारेंनी केली आहे.