IMG-LOGO
महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीने शिवसेना ठाकरे गटाबरोबर युती तोडली

Sunday, Mar 24
IMG

काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील अशा ७ जागांची माहिती काँग्रेसनं आम्हाला द्यावी. आम्ही त्यांना निश्चितपणे मदत करू, असं आंबेडकर म्हणाले.

मुंबई, दि. २४ :  महाविकास आघाडीला त्यांच्यातील जागावाटपाचा तिढा सोडवता येत नाही. त्यांनी आम्हाला ४ जागा देऊ केल्या. त्या जागा मी त्यांना परत करतो. मविआनं २६ मार्चपर्यंत काय तो निर्णय घ्यावा. आम्हाला कळवावं. अन्यथा २६ मार्चला आम्ही आमची भूमिका जाहीर करू. २७ मार्चला मी अकोल्यातून निवडणूक अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती आंबेडकरांनी दिली. वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाबरोबर असलेली युती तोडली आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे सांगितले.“महाविकास आघाडीबरोबर जाण्यासंदर्भात त्यांचाही आणि आमचाही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीत अजूनही काही जागासंदर्भात मतभेद आहेत. यातच काँग्रेसने त्यांच्या काही जागांची यादी जाहीर केली. मात्र, मतभेद असलेल्या मतदारसंघाबाबत त्यांनी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यामध्ये काही मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला, तर काही मतदारसंघावर काँग्रेसने दावा केलेला आहे. त्यामुळ एकदा त्यांचा निर्णय झाला की आमच्याबरोबर चर्चा करायला ते तयार असतील तर आम्ही तयार आहोत, अन्यथा इतर संघटनांशी आम्ही बोलून पुढची काय ती योजना आखणार आहोत” काँग्रेसला ७ जागांसाठी आम्ही दिलेली ऑफर कायम आहे. काँग्रेसनं आम्हाला ७ जागांची यादी द्यावी. आमच्यामुळे मदत होईल. काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील अशा ७ जागांची माहिती काँग्रेसनं आम्हाला द्यावी. आम्ही त्यांना निश्चितपणे मदत करू, असं आंबेडकर म्हणाले. युती करताना लोकसभेचा विचारच नव्हता संजय राऊत म्हणाले, वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर शिवसेनेची युती झाली याला दीड वर्ष झालं आणि ही युती अतिशय चांगल्या हेतूने झालेली होती.त्यात प्रामुख्याने लोकसभेचा विचार झाला नव्हता. विधानसभा आणि महानगरपालिका यासंदर्भात एकत्र काम करता येईल आणि महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे, त्याविरुद्ध एकत्र लढता येईल ही त्या दोन नेत्यांमधली भूमिका होती.

Share: