IMG-LOGO

चिमण्या वाचवा..!

Sunday, Mar 17

दिल्लीत २०१२ मध्ये जागृती निर्माण झाल्यानंतर सार्वत्रिक उठावानंतर नवी दिल्ली राज्याचा तो सन्माननीय पक्षी बनला आहे.

एक काळ असा होता की खेडोपाडी घराघरात सर्वत्र आढळणारा चिमणी हा छोटा पक्षी जगभर दिसायचा पण दुर्दैवाने गेल्या पंचवीस वर्षात त्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. इतकी कि तिचे अस्तित्वच नाहीसे होते की काय अशी भीती वाटू लागली आहे. धान्याचे छोटे कण आणि कीटक यावर ते जगतात .माणसाशी त्यांची दोस्ती त्यांना खूप आवडते.दिल्लीत २०१२ मध्ये जागृती निर्माण झाल्यानंतर सार्वत्रिक उठावानंतर नवी दिल्ली राज्याचा तो सन्माननीय पक्षी बनला आहे.आपल्याकडे महाराष्ट्रात गडहिंग्लज या शहराचा चिमणी हा पक्षी बोधचिन्ह बनला आहे. त्याचा सुंदर पुतळाही आहे आणि त्यामुळे शहराला एक नवी ओळख प्राप्त झाली आहे. यासाठी आमचे वृक्षमित्र श्री अनंत पाटील यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. याचा इतिहास मोठा प्रेरणादायी आहे. पहिला चिमणी दिवस २०१० साली जगभर ठिकठिकाणी साजरा करण्यात आला होता या दिवसाचा उद्देश घरातील चिमण्यांचे  संवर्धन आणि तसेच जे इतर सर्व सामान्य पक्षी आहेत त्यांनाही संरक्षण देणे.नेचर फोरेवर सोसायटी या भारतातील संघटनेने फ्रान्समधल्या एका संघटनेबरोबर काम सुरू केले. एका साध्या चहापानाच्या चर्चेतून ही कल्पना सुचली व साऱ्या जगाने उचलून धरली. निसर्गातील कोणतीही गोष्ट अमर नाही. त्यामुळे त्यांना संरक्षण आणि संवर्धन लागते. चिमणी दिवसाचे यावर्षीचे जागतिक घोषवाक्य आहे मी चिमण्यावर प्रेम करतो.I Love Sparrows...गडहिंग्लजप्रमाणे गारगोटीला जुन्या एसटी स्टँडच्या ऐतिहासिक पिंपळवृक्षावर हजारो पोपट बसत असतात साऱ्या गारगोटी करांनी   पोपट हा आपला सन्माननीय पक्षी म्हणून त्याचा पुतळा किंवा मोठे पोस्टर लावायला हवे त्यांना जगण्यासाठी मोठे वृक्ष जे आहेत ते तोडता कामा नयेत.२० मार्च रोजी चिमण्या आणि तत्सम छोट्या पक्ष्यांना संरक्षण देऊया आणि त्यांच्या घरट्यांचे संवर्धन करूया! डॉ. सुभाष के. देसाई

Share:
IMG
IMG IMG