IMG-LOGO
राष्ट्रीय

अरविंद केजरीवाल यांच्यावर 'ईडी'चा आरोप, २८ मार्चपर्यंत कोठडी

Saturday, Mar 23
IMG

केजरीवाल यांनी पंजाबमध्ये निवडणूक लढवण्यासाठी 'साउथ ग्रुप'च्या काही आरोपींकडून 100 कोटी रुपये मागितले होते.

दिल्ली, दि. २३ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाला (आप) मनी लाँड्रिंग सुलभ व्हावे यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यातून मिळालेल्या पैशाचा वापर ‘आप’कडून निवडणुकांसाठी करण्यात आला, असा गंभीर आरोप सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी न्यायालयात केला. तसेच, केजरीवाल यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली.अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू म्हणाले की, "केजरीवाल यांनी पंजाबमध्ये निवडणूक लढवण्यासाठी 'साउथ ग्रुप'च्या काही आरोपींकडून 100 कोटी रुपये मागितले होते." 'त्यानंतर हवाला मार्गाने मिळालेली 45 कोटी रुपयांची लाच गोवा निवडणुकीत वापरण्यात आल्याचंही' त्यांनी न्यायालयाला सांगितलं.

Share: