IMG-LOGO
प्रशासकीय

महाराष्ट्रातील १० पोलिस अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयाचे विशेष पोलिस पदक

Wednesday, Aug 12
IMG

Special Police Medal of Home Ministry to 10 Police Officers from Maharashtra

नवी दिल्ली, दि. १२ ऑगस्ट : उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलिस अधिकारी – कर्मचाऱ्यांना आज केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील १० पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने आज वर्ष २०२० साठीच्या विशेष पोलीस पदकांची घोषणा केली. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोण निर्माण व्हावा व उत्तम तपास कार्याची दखल म्हणून २०१८ पासून सुरु झालेल्या या पुरस्कारासाठी यावर्षी महाराष्ट्रातील १० पोलिस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे.

Share: