आज नवे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर दोघे कोरोनामुक्त गोंदिया दि.26 जुलै 2020 (जिमाका वृत्त ) जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आज रविवारी आणखी तीन नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे निदान गोंदियाच्या प्रयोगशाळेच्या अहवालातून झाले,तर दोन रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे.
आज नवे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर दोघे कोरोनामुक्तगोंदिया दि.26 जुलै 2020 (जिमाका वृत्त ) जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आज रविवारी आणखी तीन नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे निदान गोंदियाच्या प्रयोगशाळेच्या अहवालातून झाले,तर दोन रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे.कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या 19 झाली असून एकूण बाधित रुग्णांची संख्या 247 इतकी आहे.तर 219 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे.आज कोरोनामुक्त झालेले दोन रुग्ण असून यामध्ये देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस कॅम्पमधील नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी आलेल्या भारत बटालियनच्या दोन जवानांचा समावेश आहे.आतापर्यंत 219 बाधित रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात आज जे तीन रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे, यामध्ये तिरोडा तालुक्यातील दोन रुग्ण आणि देवरी तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 247 झाली आहे.प्रयोगशाळेत कोरोना संशयित 8179 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.यामध्ये 236 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे.रॅपिड अँटिजेन टेस्टमधून सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.प्रयोगशाळा चाचणी,अँटिजेन टेस्ट आणि बाहेर जिल्हा व राज्यात आढळून आलेल्या जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 247 झाली आहे.गोंदिया येथील विषाणू प्रयोगशाळा चाचणीतून 7774 नमुने निगेटिव्ह आले.236 नमुने पॉझिटिव्ह,63 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित असून 100 नमुन्यांच्या चाचणी अहवाल अनिश्चित आहे. जिल्ह्यातील जे रुग्ण जिल्ह्याबाहेर कोरोना बाधित आढळले आहे असे चार रुग्ण आहेत.यामध्ये नागपूर येथे तीन आणि एक रुग्ण बंगलोर येथे बाधित आढळला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या 247 आहे.विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात 149 आणि गृह विलगिकरणात 992 असे एकूण 1141 व्यक्ती विलगिकरणात आहे. जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचा शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.यामध्ये आजपर्यंत जिल्ह्यातील 1211 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये 1204 अहवाल निगेटिव्ह आले.सात व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात 148 चमू आणि 50 सुपरवायझरची 28 कॅटेंटमेंट झोनसाठी नियुक्ती केली आहे.कंटेंटमेंट झोनमधील मधुमेह, उच्च रक्तदाब,आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या घशातील स्त्राव घेण्यात येत आहे.