आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली
मुंबई, दि. ०५ नोव्हेंबर : राज्यात आज ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी, आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.०७ % एवढे झाले आहे.आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.