यावेळी प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
नाशिक दि. ०३ नोव्हेंबर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कुल येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे पुष्प देऊन स्वागत केले.यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी समवेत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ,वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख उपस्थित होते.राज्यपाल श्री. कोश्यारी स्वागताप्रसंगी पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु दिलीप म्हैसेकर,पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय अधिकारी संदीप आहेर उपस्थित होते.