IMG-LOGO
मनोरंजन

हिमालयाचं सौंदर्य प्रत्येक भारतीयांसाठी त्यानुसारच मुंबईही सगळ्यांची : कंगना

Monday, Oct 26
IMG

ज्या प्रकारे हिमालयाचं सौंदर्य प्रत्येक भारतीयांसाठी आहे. त्यानुसारच मुंबईही सगळ्यांची आहे. तिथे मिळणाऱ्या संधी या प्रत्येक भारतीयांसाठी आहेत.

रामानं रावणाचा वध केला. आपणही प्रातिनिधीक स्वरूपात रावणाचा वध करतो. हा रावण दहा तोंडांनी महाराष्ट्रावर आलेला आहे. रावणाचं एक तोंड म्हणतंय, मुंबई पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे. महाराष्ट्र मुंबई पोलीस निकम्मे आहेत. ते काही काम करत नाहीयेत. इकडे सगळे नशिले आहेत. ही कसली रावणी औलाद अशी टीका उद्धव ठाकरे यांनी कंगनाची नाव न घेता केली होती. त्या  कंगनाने उत्तर दिले असून मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत, यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं? ते महाराष्ट्र स्वत:च्या मालकीचा असल्याचासारखं का वागतात? असा सवाल कंगनाने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.   मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल, असं विधान कंगनानं केलं आहे.मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कुणी बनवलं? ते फक्त जनतेचे सेवक आहेत. त्यांच्यापूर्वी कुणी होतं, त्यांच्यानंतरही कुणीतरी त्यांची जागा घेईल. ते महाराष्ट्रात स्वत:च्या मालकीच्या असल्यासारखं का वागतात?' असा प्रश्न कंगनाने विचारला आहे. ज्या प्रकारे हिमालयाचं सौंदर्य प्रत्येक भारतीयांसाठी आहे. त्यानुसारच मुंबईही सगळ्यांची आहे. तिथे मिळणाऱ्या संधी या प्रत्येक भारतीयांसाठी आहेत.असे ट्विट कंगनाने केले आहे. 

Share: