IMG-LOGO
नाशिक शहर

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विनय ठकार यांचे निधन

Thursday, Oct 29
IMG

डॉ.विनय ठकार यांनी नाशिक जिल्ह्यात अनेक आधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी वैद्यकीय व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.

नाशिक, दि. २९ ऑक्टोबर  : जिल्ह्यातील पहिले हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विनय ठकार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. डॉ.विनय ठकार यांनी नाशिक जिल्ह्यात अनेक आधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी वैद्यकीय व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. वैद्यकीय क्षेत्रासोबतच त्यांनी विविध समाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे विश्वस्त म्हणून काम केले.

Share: