IMG-LOGO
महाराष्ट्र

भिवंडीत इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू

Monday, Sep 21
IMG

1984 साली ह्या इमारतीचे बाधंकाम झाले असून रात्री अचानक ह्या इमारतीचा एक भाग कोसळला. रात्री साडेतीनच्या दरम्यान सगळे लोकं झोपेत होते आणि त्याचदरम्यान ही घटना घडली आहे.

 भिवंडी, दि. २१ सप्टेंबर :  येथील एक तीन मजली इमारत पहाटेच्या वेळेस कोसळ्याची घटना घडली. या इमारतीत जवळजवळ 40 च्या आसपास घर असल्याची माहिती देण्यात आली आहे. इमारत कोसळल्यानंतर काही नागरिक त्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले गेले तर सकाळपर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफच्या टीमने आतापर्यंत 20 जणांना बाहेर काढले आहे. तर आणखी 20 ते 25 जण इमारतीच्या ठिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. 1984 साली ह्या इमारतीचे बाधंकाम झाले असून रात्री अचानक ह्या इमारतीचा एक भाग कोसळला. रात्री साडेतीनच्या दरम्यान सगळे लोकं झोपेत होते आणि त्याचदरम्यान ही घटना घडली आहे. कोसळलेल्या त्या भागात सुमारे 21 कुटुंब राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. इमारत कोसळल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर ही इमारत 43 वर्ष जुनी होती. त्याचसोबत कोसळलेली इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

Share: