IMG-LOGO
महाराष्ट्र

आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना : किशोरी पेडणेकर

Tuesday, Nov 03
IMG

ज्या कामासाठी ती जागा मागत आहोत, ते काम लोकांचंच आहे. मीठागराच्या अशा अनेक जागा आहे. त्या डावलण्यात आल्या आहे. आपण बाजूला कुठे तरी मिठागर करु शकतो, असं किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय.

मुंबई, दि. ०३ नोव्हेंबर : मेट्रो कारशेडच्या मुद्यावरुन जगाला किती खालच्या पातळीवर राजकारण सुरु आहे हे दिसतं आहे. जर ती केंद्राची जागा आहे, तर ती जागा महाराष्ट्राच्या कामासाठी मागत आहोत. अशा अनेक जागा आहेत, त्या केंद्राने दिल्या असतील. पण कुरघोड्या करणं असे काही होत आहे. तर मराठीतील म्हणीप्रमाणे आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना अशी महाराष्ट्राची अवस्था करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे,' असे किशोरी पेडणेकर यांनी म्हणत केंद्राला सुनावले आहे.ज्या कामासाठी ती जागा मागत आहोत, ते काम लोकांचंच आहे. मीठागराच्या अशा अनेक जागा आहे. त्या डावलण्यात आल्या आहे. आपण बाजूला कुठे तरी मिठागर करु शकतो, असं किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय. आरे हे जंगल आहे. त्या ठिकाणच्या स्थानिकांनी विरोध केला होता. मात्र याबाबत नक्की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलतील. जर मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात तर ते महाराष्ट्रावरही करतात. त्यामुळे जे निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे असतील, त्यावर नक्कीच विचारविनिमय केला जाईल, असंही किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय.

Share: