IMG-LOGO
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या समित ठक्करला अटक

Monday, Oct 26
IMG

समित ठक्करला नागपूर पोलिसांनी गुजरातमधील राजकोटमधून अटक केली आहे. समित ठक्करला ट्रांजिट रिमांडवर नागपूरला आणण्यात आले असून आज न्यायालयात दाखल केले जाणार आहे.

मुंबई, दि. २६ ऑक्टोबर  : पर्यावरण तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या तसेच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करला काल राजकोटमधून अटक केली आहे. आज त्याला नागपूर कोर्टात हजर करणार आहेत. अमृता फडणवीसांसहीत अनेकांनी त्याची पाठराखण केली होती.धार्मिक भावना दुखावतील असे मजकूर ट्विट करतो, असे आरोप शिवसैनिकांनी केले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलीस समित ठक्करचा शोध घेत असताना समुतला काही अटींवर न्यायालयातून दिलासा मिळत अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा समित ठक्करच्या ट्विटर अकाउंटवरुन राज्य सरकार आणि शिवसेनेविरोधात टीका सुरु झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून खासकरून ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर खाजगी टीका करणाऱ्या समित ठक्करला नागपूर पोलिसांनी गुजरातमधील राजकोटमधून अटक केली आहे. समित ठक्करला ट्रांजिट रिमांडवर नागपूरला आणण्यात आले असून आज न्यायालयात दाखल केले जाणार आहे. 

Share: