IMG-LOGO
महाराष्ट्र

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक ; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना पत्र

Monday, Nov 09
IMG

राज्य महामार्ग परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचाऱ्यांची सध्या परवड सुरू आहे. ह सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

मुंबई, दि. ०९ नोव्हेंबर : राज्यातील एसटी कर्मचार्‍यांना तीन महिन्यांपासून वेतनात कपात, त्यांची होणारी पिळवणूक, कामगार कपातीच्या संकटामुळे सातत्याने डोक्यावर टांगती तलवार,  भविष्यासाठीची अनिश्चितता यासारख्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.राज्य महामार्ग परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचाऱ्यांची सध्या परवड सुरू आहे. ह सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून काही महिन्यांचे आंशिक वेतन त्यांना प्राप्त झाले, जूनचे तर वेतनही अजून प्राप्त झालेले नाही. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे 25 टक्के वेतन अजूनही मिळालेले नाही, मे महिन्याचे 50 टक्के वेतन अजून मिळालेले नाही, तर जून महिन्याचे 100 टक्के वेतन अजून मिळालेले नाही. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांवर अर्थार्जनासाठी भाजीपाला विकणे, गवंडी काम करण्याची वेळ आली आहे. एसटीच्या लाखांवर कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सध्या अतिशय अस्थितर मानसिकतेतत जीवन जगत असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी पत्रात नमूद केले आहे.एकीकडे वेतन नाही आणि दुसरीकडे भविष्यात नोकऱ्या तरी टिकणार का, ही चिंता त्यांना सतावत आहे. दुष्काळी भागातील ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना आपण 2019मध्ये एसटीच्या सेवेत सामावून घेतले, त्यातील 4500 जणांना घरी बसविण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत त्यांना सेवेवर येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. 50 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्याचाही घाट घातला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांपैकी 328 कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या 8 जणांच्या कुटुंबीयांना अद्यापही मदत मिळालेली नाही. त्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

Share: