नितीश कुमार हे ६ वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. नितीश कुमार यांनी 2004 मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती.
पाटणा, दि. ०५ नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार आज थंडावला. आता परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला', असं वक्तव्य नितीश कुमार यांनी केलं.नितीश कुमार हे ६ वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. नितीश कुमार यांनी 2004 मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांनी नालंदामधून विजय मिळवला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. 2005 मध्ये नितीश कुमार NDAची सत्ता आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत बिहार विधान परिषदेचे सदस्यता स्वीकारली.शेवटच्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 1 हजार 208 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत.