पं.सुरेशराव हळदणकर, पं.वसंतराव कुलकर्णी, पं.निवृत्तीबुवा सरनाईक अशा दिग्गजांकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या बहारदार गायकीने अनेक मैफिली गाजवल्या.
मुंबई दि.०२ नोव्हेंबर : जयपूर अत्रौली घराण्याचे ख्यातनाम गायक पं. दिनकर पणशीकर यांचे आज दुपारी चारच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. ज्येष्ठ अभिनेते स्व.प्रभाकर पणशीकर व प्रसिद्ध व्याख्याते श्री.दाजी पणशीकर यांचे ते कनिष्ठ बंधू आणि गायक पं.भूपाल पणशीकर यांचे ते पिताश्री होत. पं.सुरेशराव हळदणकर, पं.वसंतराव कुलकर्णी, पं.निवृत्तीबुवा सरनाईक अशा दिग्गजांकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या बहारदार गायकीने अनेक मैफिली गाजवल्या.