IMG-LOGO
महाराष्ट्र

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला

Monday, Nov 09
IMG

इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अनर्ब यांना अटक करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अन्वय यांनी अर्णब आणि इतर दोघांची नावे लिहीली होती.

मुंबई, दि. ०९ नोव्हेंबर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासह नितीश सारडा आणि फिरोज शेख यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे. नियमाप्रमाणे जामीनासाठी आधी सत्र न्यायालयात याचिका करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना दिले आहेत. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अनर्ब यांना अटक करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अन्वय यांनी अर्णब आणि इतर दोघांची नावे लिहीली होती. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे काम पूर्ण केल्यानंतर ८३ लाख रुपये बुडविल्याचा आरोप या चिठ्ठीत अन्वय यांनी केला आहे. अटकेनंतर अर्नब यांना अलिबाग न्यायलायात हजर केले असता न्यायालाने अर्णब यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Share: