IMG-LOGO
राष्ट्रीय

US election : बिडेन यांची वाटचाल विजयाच्या दिशेने

Wednesday, Nov 04
IMG

हाती आलेल्या निकालावर दोन्ही नेत्यांनी असमाधान व्यक्त केले आहे. मतमोजणीत अनेक ठिकाणी गैर प्रकार सुरू आहे, असा गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला

नवी दिल्ली, दि. ०४ नोव्हेंबर : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी काउंटिंग सुरू आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, आतापर्यंतच्या आकडेवारीत बायडेन यांना २३८, तर ट्रम्प यांना २१३ इलेक्टर्स मतं मिळाले आहेत. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालाचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. मतमोजणी सुरु आहे, सध्या डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन आघाडीवर आहेत. अमेरिकेतील 50 पैकी 22 राज्यांचा कल हाती आला आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. तर आणखी 5 राज्यांमध्ये ते आघाडीवर आहे. तर कॅलिफोर्नियासह 11 राज्यांमध्ये बायडन यांनी विजय मिळवला आहे. तर 3 राज्यात बायडन आघाडीवर आहे. परंतु, हाती आलेल्या निकालावर दोन्ही नेत्यांनी असमाधान व्यक्त केले आहे. मतमोजणीत अनेक ठिकाणी गैर प्रकार सुरू आहे, असा गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. तर बायडन यांनी सुद्धा कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. अजूनही मतमोजणी सुरू असून बायडन आणि ट्रम्प यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षाला पूर्ण बहुमत गाठण्यासाठी 270 जागांची गरज आहे.

Share: