IMG-LOGO
महाराष्ट्र

'त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन'; राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसेंचा भाजपाला इशारा

Friday, Oct 23
IMG

भाजपासाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करणार आहे. भाजपा ज्या वेगाने वाढवला, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवू.

मुंबई, दि. २३ ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत अखेर उत्तर महाराष्ट्राचे मोठे नेते एकनाथ खडसे यांनी NCP मध्ये प्रवेश केला. गेली काही वर्षं खडसे यांची भाजपमधली नाराजी लपून राहिलेली नव्हती. विधानसभा निवडणुकांनंतर तर त्यांनी उघड भूमिका घ्यायला सुरुवात केली होती. अखेर अनेक दिवसांच्या चर्चेनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुलगी रोहिणी खडसे यांच्यासह प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.  भाजपासाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करणार आहे. भाजपा ज्या वेगाने वाढवला, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवू, असे खडसे म्हणाले. तसेच माझ्यामागे त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशाराही एकनाथ खडसे यांनी भाजपाला दिला आहे.

Share: