कामकाज नियमित सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बँकेचं कुठलंही काम अडणार नाही. त्याची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई, दि. २५ ऑक्टोबर : रिझर्व्ह बँकेचेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. दास यांनीच ट्विट करून याची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणे नाहीत. प्रकृतीही चांगली आहे. सध्या मी क्वारंटाईन झालो आहे अशी माहितीही त्यांनी दिली. जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत त्या सगळ्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी असंही त्यांनी सांगितलं. कामकाज नियमित सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बँकेचं कुठलंही काम अडणार नाही. त्याची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. मी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात आहे आणि राहिन असंही त्यांनी सांगितलं.काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली होती. जर कोरोनाची दुसरी लाट आली तर अर्थव्यवस्था रुळावर आणणे कठीण होऊन जाईल असे, म्हटले होते. ज्या प्रकारे कोरोनाने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे, त्यातून ती पुन्हा सुधारत आहे. परंतू जर दुसरी लाट आली तर परिस्थिती बिघडू शकते असे ते म्हणाले होते.