IMG-LOGO
COVID-19

देशात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के

Monday, Oct 26
IMG

एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ८.५० टक्के आहे, तर आतापर्यंत ७० लाख ७८ हजार १२३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

नवी दिल्ली, दि. २६ ऑक्टोबर : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल ७९ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर एक लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात केलल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.देशभरात ७० लाखांहून अधिक लोकांनी व्हायरसवर मात करून कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. उपचारानंतर कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवीन रुग्णांपेक्षा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण हे आता जवळपास ९० टक्के झाले आहे. देशात सध्या ६ लाख ६८ हजार १५४ कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ८.५० टक्के आहे, तर आतापर्यंत ७० लाख ७८ हजार १२३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे बरे झालेल्या आणि सक्रिय रुग्णांमधील अंतर वाढत असून हा फरक ६४ लाख ९ हजार ९६९ रुग्ण इतका आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ५७८ जणांचा मृत्यू झाल आहे. त्यातील ८० टक्के रुग्ण केवळ १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधित १३७ जणांच्या मृत्यूची नोंद असून त्या पाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये ५९, छत्तीसमध्ये ५५ तर कर्नाटकात ५२ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. 

Share: