IMG-LOGO
COVID-19

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्क्यांवर

Monday, Oct 26
IMG

महाराष्ट्रात आज दिवसभरात ९ हजार ९०५ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.आज राज्यात ३ हजार ६४५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

महाराष्ट्रात आज दिवसभरात ९ हजार ९०५ कोरोना  रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.आज राज्यात ३ हजार ६४५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४ लाख ७० हजार ६६० इतकी झाली आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता ८९.२ टक्के इतका झाला आहे. आज ९,९०५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १४,७०,६६० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.२ % एवढे झाले आहे.आज राज्यात ३,६४५ नवीन रुग्णांचे निदान.राज्यात आज ८४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८६,४५,१९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,४८,६६५ (१९.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात २५,३०,९०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज रोजी एकूण १,३४,१३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Share: