IMG-LOGO
महाराष्ट्र

शरद पवार राज्य चालवतात, उद्धवांना बोलून काही उपयोग नाही; चंद्रकांत पाटील यांची टीका

Thursday, Oct 29
IMG

राज्यपालांनी काय सांगितलं हे मला माहीत नाही. ते कोणत्या हेतूने बोलले हेही मला माहीत नाही. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही.

सांगली, दि. २९ ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही. व्हिडीओ कॉन्फरर्सद्वारे चर्चा करीत नाहीत. ते काय प्रश्न सोडविणार? त्यांना भेटून काय उपयोग? त्यांनी सरकार चालविण्याचा ठेका उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्याकडे दिला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केली. महापालिकेच्या विविध विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त प्रदेशाध्यक्ष पाटील सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढीव वीज बिलासंदर्भात भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी त्यांना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. त्याबाबत पाटील यांना छेडले असता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्यपालांनी काय सांगितलं हे मला माहीत नाही. ते कोणत्या हेतूने बोलले हेही मला माहीत नाही. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. सध्या लोकांना शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहज उपलब्ध होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं अशी लोक भावना झाली आहे.

Share: