पोलिस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती.
नागपूर, दि. २२ ऑक्टोबर : पोलिस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणी यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता ठाकूर यांच्या शिक्षेला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे.पोलिस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती.यशोमती ठाकूर यांना 15 ऑक्टोबरला तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. आठ वर्ष जुन्या प्रकरणात ठाकूर यांना शिक्षा झाली होती.मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. यावर निर्णय घेताना उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली.