एक घोटाळेबाज आणि एक धोकेबाज, बिहारची जनता करणार दोघांचा उपचार! असेही सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच बोले बिहार बदलें सरकार हा हॅशटॅगही वापरला आहे.
नवी दिल्ली, दि. ०१ नोव्हेंबर : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीचा प्रचार जोरात सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसेचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी छपरा येथील प्रचार रॅलीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये डबल इंजीनचे सरकार नाही, तर धोकेबाज आणि घोटाळेबाज सरकार आहे, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. मोदीजी, २०१५ मधील निवडणुकीत नितीश कुमार यांना १८ व्या शतकातील मानसिकतेचे म्हणाले होते. आज त्यांना छपरा येथे डबल इंजिन म्हणत आहेत. मात्र सत्य हे आहे की, हे डबल धोक्याचे सरकार आहे. एक घोटाळेबाज आणि एक धोकेबाज, बिहारची जनता करणार दोघांचा उपचार! असेही सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच बोले बिहार बदलें सरकार हा हॅशटॅगही वापरला आहे.