मेळाव्यात उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तडाखेबंद भाषणातून विरोधकांवर चौफेर हल्लाबोल केला.
मुंबई, दि. २५ ऑक्टोबर : राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तडाखेबंद भाषणातून विरोधकांवर चौफेर हल्लाबोल केला. सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यासरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात हिंदुत्वाचा अर्थ समजून सांगितला. भागवतांना मानणारे लोक असतील तर त्यांनी नुसती काळी टोपी घालू नये. त्या टोपीखाली डोकं असणाऱ्यांनी थोडा विचारही केला पाहिजे. हिंदुत्व समजून घेतलं पाहिजे. हिंदुत्वाबाबत काही लोक भ्रम पसरवित आहेत. हिंदुत्वाचा अर्थ पूजेशी जोडून संकुचित करत आहेत, असं भागवत म्हणाले. त्यामुळे भागवतांनी सांगितलेला हा अर्थ समजून घ्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे?हरियाणातील बिष्णोईंसोंबत जो डाव खेळला तोच डाव शिवसेनेविरुद्ध खेळला. तोच डाव बिहार मध्ये होतोय. देशाची विल्हेवाट लागत चालली आहे. संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे घालत आहात, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. मी ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून कारभाराला सुरुवात केली त्या दिवसापासून अनेकजण सरकार पडेल, असं स्वप्न बघत आहेत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपाला चिकटणारे मुंगळे नाहीत. पण जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो ते दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असे उद्धव ठाकरे म्हणाले. प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असं विचारलं जाते.पण,टार्गेट करण्यासाठी नाही.पण,सध्या कोरोना जोरात आहे.बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत.काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं.काही जणांना तर माणसाचं नाही,तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर अशी बेडक आहेत.तुम्हाला माहिती आहे,एक बेडूक आणि त्याची दोन पोरं.या पक्षातून त्या पक्षात.या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला,त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली.तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला,पण त्याचा आवाज आता चिरका झालाय,अशा शब्दांत उध्दव ठाकरे यांनी राणे कुटुंबियांवर सडूकन टिका केली आहे.महाराष्ट्राच्या संस्कृतीत घरासमोर तुळसी वृदांवन आहेत. गांजाची वृदांवन नाहीतघरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत महाराष्ट्रात यायचं आणि नंतर दाखवायचं की आम्ही कष्ट केले आहे. मुंबई, महाराष्ट्राचं मीठं खायचं आणि नमक हरामी करायची ही असली रावणी औलाद, महाराष्ट्राची बदनामी कशासाठी करायाची. महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु आहेत. महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनामी केली जात आहे, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. मुंबई पाकव्याप्त काश्मीर मुंबई पोलिस काही काम करत नाही, शिवाजी पार्कात गांजा चरसची शेती आहेत, चरस गांजा उघड विकला जातो. पण त्यांना हे माहिती नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीत घरासमोर तुळसी वृदांवन आहेत. गांजाची वृदांवन नाहीत. ते तुमच्या घरी गांजाची शेती असेल, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी कंगनाला लगावला.