ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे.
मुंबई, दि. २७ ऑक्टोबर : राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज ५ हजार ३६३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या १ लाख ३१ हजार ५४४ अॅक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आज ११५ कोरोना बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून सध्याचा मृत्यूदर २. ६३ टक्के इतका आहे.राज्यात गेल्या काही महिन्यांपासून करोना संसर्गानं थैमान घातलं होतं. राज्यात कोरोनाची परिस्थीती नियंत्रणाबाहेर जात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत असातनाच ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे. हा राज्यासाठी मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे. आजही तब्बल ७ हजार ८३६ रुग्ण बरी होऊन घरी गेले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १४ लाख ७८ हजार ४९६वर पोहोचली आहे. तर, राज्याचा रिकव्हरी रेट ८९. ३९ टक्क्यांवर पोहोचला आहे.