IMG-LOGO
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींना दिलासा नाही; आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार!

Friday, Nov 06
IMG

आज दुपारी ३ वाजता कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्यावतीने हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ सुनावणी चालली.

मुंबई, दि. ०६ नोव्हेंबर  : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आजही मुंबई हाटकोर्टात अंतरिम दिलासा मिळाला नाही. गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आता उद्या दुपारी १२ वाजता पुढील सुनावणी होणार आहे. उद्या केवळ अंतरिम दिलासाविषयी सुनावणी घेऊ, असे स्पष्ट संकेत खंडपीठाने दिले आहेत.आज दुपारी ३ वाजता कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्यावतीने हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ सुनावणी चालली. त्यानंतर 'आज सुनावणी पूर्ण करणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे उद्या दुपारी ११ वाजता आम्ही पुन्हा सुनावणी ठेवू, असे नमूद करत कोर्टाने अर्णब यांना आज कोणताही अंतरिम दिलासा दिला नाही.

Share: