गेल्या ३५ वर्षात अमेरिकेत सर्वात कमी कार्बन उत्सर्जन होत आहे. आपली हवा स्वच्छ आहे. पाणी सर्वात स्वच्छ आहे आणि कार्बन उत्सर्जन सर्वात कमी आहे.
वॉशिंग्टन, दि. २३ ऑक्टोबर : अमेरिकेत निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि बायडन यांच्यात शाब्दीक चकमकही वाढल्या आहेत. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. ट्रम्प यांनी चीन, भारत आणि रशियावर वायू प्रदूषणाशी निगडीत योग्य पाऊले न उचलल्याचा आरोप केला आहे.शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यातील चर्चेची शेवटची फेरी संपली. डोनाल्ड ट्रम्प यांनी या फेरीत हवामान बदलाच्या मुद्यावर भूमिका मांडताना भारतासह चीन, रशियावर टीका केली. हवामान बदलाच्या दिशेनं भारताकडून केल्या जाणाऱ्या कामावर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारत, चीन आणि रशियाचे हवामान बदलाच्या लढाईत काम चांगले नसल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, गेल्या ३५ वर्षात अमेरिकेत सर्वात कमी कार्बन उत्सर्जन होत आहे. आपली हवा स्वच्छ आहे. पाणी सर्वात स्वच्छ आहे आणि कार्बन उत्सर्जन सर्वात कमी आहे. चीनकडे पहा. किती घाणेरडी हवा आहे. रशियाकडे पहा किती घाण आहे. भारताकडे पहा किती घाणेरडी हवा असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. भारतात ट्र्म्प यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली जात आहे.