मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी हे आयोजन करण्यात आले होते. मात्र आता ही परिषद रद्द करण्यात आली आहे.
पुणे, दि. ३० ऑक्टोबर : भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने आज पुण्यात मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी हे आयोजन करण्यात आले होते. मात्र आता ही परिषद रद्द करण्यात आली आहे. मराठा आरक्षण परिषद रद्द करण्याचा निर्णय उदयनराजे भोसले यांनीच घेतला आहे. ते परिषदेच्या ठिकाणीही येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र परिषद अचानक रद्द करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या परिषदेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल अशी विद्यार्थ्यांना आशा होती, मात्र आता त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.