बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसला हरवण्यासाठी आणि बिहारमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपने संकल्पपत्रात 11 मोठ्या घोषणा केल्या आहेत.
नवी दिल्ली, दि. २२ ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पार्टीने गुरूवारी पार्टीचा घोषणापत्र सादर केला. त्यात भाजपाने अनेक मोठमोठे विधानं केले. त्यातला एक विधान सध्या बिहार प्रचाराचा मुद्दा झाला आहे. बिहारमध्ये जर भाजपाची सत्ता आली तर बिहारमधील सर्व जनतेला कोरोनाची लस भाजप मोफत उपलब्ध करून देणार आहे. असे भाजपच्या वतीने प्रचारसभेत सांगण्यात आले.बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसला हरवण्यासाठी आणि बिहारमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपने संकल्पपत्रात 11 मोठ्या घोषणा केल्या आहेत. 5 सूत्र एक लक्ष असं या संकल्पपत्रात भाजपने म्हटलं आहे. बिहारमधील जनतेला मोफत कोरोनाची लस देणार, एक कोटी महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करणार, 19 लाख नोकर्या देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. दरम्यान, काँग्रेस आणि लोकजनशक्ती पक्षानं बुधवारीच आपापले जाहीरनामे प्रकाशित केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुख्यत्वे दोन आश्वासनं देण्यात आली आहेत. शेतकर्यांना कर्जमाफी आणि केंद्र सरकारनं आणलेले शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे, ही ती दोन आश्वासनं आहेत. तर लोकजनशक्ती पक्षानं मबिहार फर्स्ट, बिहारी फर्स्टफचा नारा देत बिहारचा विकास आणि नवे रोजगार यांचं आश्वासन दिलंय.