IMG-LOGO
राष्ट्रीय

मुलींना फसवलत तर 'राम नाम सत्य है' ; योगींचा इशारा

Saturday, Oct 31
IMG

कोर्टाने कुराणातल्या हादीसचं उल्लेख करत असं मत नोंदवलं होतं की, इस्लाम विषयी माहिती न घेता, त्या धर्मातल्या तत्व आणि शिकवणुकीचा अभ्यास न करता धर्मांतर करणं हे इस्लामला मान्य नाही. कोर्टाचा हा निर्णय दूरगामी परिवर्तन करणारा ठरू शकतो.

जौनपूर, दि. ३१ ऑक्टोबर : राज्यातील माता-भगिनींच्या सन्मानाशी खेळण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. असे खेळ करणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल, असा गंभीर इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.जौनपूर आणि देवरिया येथील सभेत ते बोलत होते. यासाठी सरकार देखील निर्णय घेत आहे की, लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचे काम केले जावे.  सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशार देत आहे जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधाराला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले, अलाहाबाद न्यायालयाने निर्णय दिला आहे की, केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही. धर्म परिवर्तन नाही केले गेले पाहिजे. याला मान्यता मिळाली नाही पाहिजे. कोर्टाने कुराणातल्या हादीसचं उल्लेख करत असं मत नोंदवलं होतं की, इस्लाम विषयी माहिती न घेता, त्या धर्मातल्या तत्व आणि शिकवणुकीचा अभ्यास न करता धर्मांतर करणं हे इस्लामला मान्य नाही. कोर्टाचा हा निर्णय दूरगामी परिवर्तन करणारा ठरू शकतो.

Share: