समय शाहने आपल्या इंस्टा स्टोरीवर या घटनेविषयी सविस्तर सांगितले आहे. त्याच्या या पोस्टनुसार, २७ ऑक्टोबरला त्याच्या मुंबईतल्या घरी येऊन काही लोकांनी त्याला धमकावले होते.
मुंबई, दि. ३० ऑक्टोबर : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेल्या अभिनेता समय शाहला काही गुंडांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्यानी बोरीवली पोलिस ठाण्यात त्याने तक्रार दाखल केली असून काही गुंड सतत जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. शिवाय त्याने सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना दिले आहेत. सध्या हे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी देखील त्याला दोन वेळा धमकी देण्यात आली आहे. समय शाहने आपल्या इंस्टा स्टोरीवर या घटनेविषयी सविस्तर सांगितले आहे. त्याच्या या पोस्टनुसार, २७ ऑक्टोबरला त्याच्या मुंबईतल्या घरी येऊन काही लोकांनी त्याला धमकावले होते. सीसीटीव्ही फुटेजमधला एक फोटो पोस्ट करत, याबद्दल लिहिताना त्याने म्हटले की, 'हा माणूस दोन दिवसांपूर्वी माझ्या सोसायटीत आला होता. अचानक त्याने मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने मला ठार मारण्याची धमकीही दिली.' 'मी ही माहिती पोस्ट करत आहे, जेणेकरून माझ्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना या गोष्टीची आगाऊ माहिती असावी', असे त्याने म्हटले आहे.