IMG-LOGO
राष्ट्रीय

...अन् भर सभेत ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, काँग्रेसला मत द्या

Sunday, Nov 01
IMG

त्यांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून, काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यावरून चिमटे काढले आहेत.

भोपाळ, दि. ०१ नोव्हेंबर : मध्य प्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक होत असून, प्रचारात आरोपप्रत्यारोप जोरात सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ व ज्योतिरादित्य शिंदे यांचे सर्वस्व पणाला लागलेले आहे. दरम्यान, एका प्रचारसभेत ज्योतिरादित्य शिंदे यांना आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे याचा विसर पडल्याचे दिसले कारण त्यांनी भरसभेत जनतेला चक्क काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून, काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यावरून चिमटे काढले आहेत. दरम्यान महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे. आणि याला 'आदत से मजबूर' असा लिहीत शिंदे यांना टोला लगावलाय.

Share: