IMG-LOGO
महाराष्ट्र

महाराष्ट्रात तपासासाठी सीबीआयला घ्यावी लागणार परवानगी

Thursday, Oct 22
IMG

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून राजकीय प्रतिस्पर्ध्यांविरोधात विविध यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला.

मुंबई, दि. २२ ऑक्टोबर : राज्यातील कोणत्याही प्रकरणात तपासासाठी सीबीआयला दिलेली सर्वसाधारण संमती महाराष्ट्र सरकारने आदेश जारी करून मागे घेतली आहे. आता सीबीआयला राज्यात तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तथापि, आधीपासून सुरू असलेल्या तपासावर या आदेशाचा परिणाम होणार नाही. मागील काही काळात केंद्रीय आणि काही राज्यांच्या यंत्रणांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यातून भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून राजकीय प्रतिस्पर्ध्यांविरोधात विविध यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून पश्चिम बंगाल आणि राजस्थान यांसारख्या राज्यांनी सीबीआयला विनापरवानगी तपास करण्यास मनाई केली. आता तसाच निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

Share: