IMG-LOGO
राष्ट्रीय

शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ हजार जमा होणार

Friday, Feb 12
IMG

एखाद्या शेतक-यानेने अर्ज केल्यानंतर त्याला आधीच्या हप्त्यांचे पैसे मिळतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालबाबत असेच विधान केले आहे.

यापूर्वी मदत न मिळालेल्यांनाही पैसे मिळणार; लाखो शेतक-यांना फायदानवी दिल्ली, दि. १२ फेब्रुवारी : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शेतक-यांना फायदा करून देण्याचा केंद्र  सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी नियमांत बदल करण्यात येत आहे. आतापर्यंत फायदा न मिळालेल्या शेतक-यांच्या खात्यावर मागच्या दोन वर्षांसह या वर्षाचे असे तीन वर्षांचे प्रत्येकी 18 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्याचा सुमारे 69 लाख शेतक-यांना फायदा होणार आहे. एखाद्या शेतक-यानेने अर्ज केल्यानंतर त्याला आधीच्या हप्त्यांचे पैसे मिळतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालबाबत असेच विधान केले आहे. शाह यांनी तेथील शेतक-यांना सांगितले, की पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार आल्यास पहिल्याच मंत्रिमंडळात आम्ही मागच्या बारा हजार रुपयांसह सहा हजार रुपये देऊ. म्हणजेच आपल्या खात्यात 18 हजार रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत. आतापर्यंत पश्‍चिम बंगालच्या एकाही शेतकर्‍याला या योजनेचा लाभ मिळालेला नाही. कारण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी होऊ दिली नाही.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांचे विधान गेमचेंजर ठरू शकते; परंतु अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. सध्या पश्चिम  बंगालमध्ये पंतप्रधान किसान योजना हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. कारण सुमारे 69 लाख शेतक-यांचे नऊ हजार 660 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने बंदी असूनही तेथील 24,लाख 41 हजार 130 शेतक-यांनी स्वत: ऑनलाईन अर्ज केले आहेत; परंतु तांत्रिक कारणांमुळेही मोदी सरकार थेट शेतक-यांच्या खात्यावर पैसे पाठविण्यास सक्षम नाही. कारण पडताळणीचे काम राज्याचे आहे. संपूर्ण तरतूद शेतक-यांवर खर्च झाली नाही, कारण सर्वांना डिसेंबर 2018 पासून लाभ मिळाला नाही. ज्या व्यक्तीने अर्ज केला आणि त्याला मंजुरी मिळाली, त्यानंतरचा त्याला हप्ता मिळू लागला. या योजनेंतर्गत आतापर्यंत 11.52 कोटी शेतक-यांना लाभ मिळाला. सातवा हप्ता जाहीर झाला आहे; परंतु सर्व लाभार्थ्यांना 14-14 हजार रुपये मिळाले नाहीत. काहींना 2000, काहींना 4000 आणि काहींना 14,000 रुपये मिळाले आहेत. ज्याची नोंदणी सुरुवातीस झाली, त्यास अधिक फायदा मिळाला.

Share: