IMG-LOGO
राष्ट्रीय

नितीश कुमारांवर कांदे फेकले; जाहीर सभेत घडला प्रकार

Tuesday, Nov 03
IMG

बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यासाठी १७ जिल्ह्यांमधील ९४ जागांसाठी मतदान होत आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. यासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मधुबनीतील सभांना संबोधित करण्यासाठी पोहोचले होते.

मधुबनी, दि. ०३ नोव्हेंबर  : सध्या बिहार विधानसभा २०२० निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली असून त्यासाठी जोरादार प्रचार सभा सुरू आहेत.  नितीश कुमार जेव्हा मधुबनी येथील हरलाखी विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेसाठी पोहोचताच त्यांना स्थानिक लोकांनी प्रचंड विरोध केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे नितीश कुमार भाषणासाठी उभे राहताच उपस्थित लोकांनी त्यांच्या दिशेने कांदा फेकल्याने काही वेळ गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांनी लगेचच यांना घेरून संरक्षण दिलं.बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यासाठी १७ जिल्ह्यांमधील ९४ जागांसाठी मतदान होत आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. यासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मधुबनीतील सभांना संबोधित करण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान, याआधी देखील सीएम नितीश कुमार यांच्या सभेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. नितीश कुमार हे नुकतेच छपराच्या पारसा विधानसभा मतदारसंघात जेडीयूचे उमेदवार आणि लालू प्रसाद यादव यांच्या विहीण चंद्रिका राय यांच्या प्रचारासाठी पोहोचले होते. त्यावेळी लोकांनी लालू-लालू अशी घोषणाबाजी देखील केली होती. त्यामुळे यंदाची निवडणूक नितीश कुमार यांना वाटते तेवढी सोप्पी नक्कीच नसेल.

Share: