राज्यात १ लाख ४० हजार १९४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात मागील २४ तासात ६ हजार ४१७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मुंबई, दि.२४ ऑक्टोबर : महाराष्ट्रात आज १० हजार रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १४,५५,१०७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७८ % एवढे झाला आहे. आज राज्यात ६,४१७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात आज १३७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८५,४८,०३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,३८,९६१ (१९.१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,०३,५१० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १४,१७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १ लाख ४० हजार १९४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात मागील २४ तासात ६ हजार ४१७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १६ लाख ३८ हजार ९६१ इतकी झाली आहे.