IMG-LOGO
COVID-19

राज्यात आज ९१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद

Wednesday, Oct 28
IMG

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ६८ हजार ८७९ नमून्यांपैकी १६ लाख ६० हजार ७६६ नमूने (१८.९४ टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर : राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ८६ हजार ९२६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.५३ टक्के एवढे झाले आहे.आज राज्यात ६,७३८ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. राज्यात आज ९१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ६८ हजार ८७९ नमून्यांपैकी १६ लाख ६० हजार ७६६ नमूने (१८.९४ टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीस राज्यात २५ लाख २८ हजार ५४४ जण गृह विलगीकरणात आहेत. तर १२ हजार ९८८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Share: