कोरोनाच्या आधी प्रत्येक दिवसाला ३५ लाख प्रवासी हे पश्चिम रेल्वेवर प्रवास करायचे, मात्र आता एका लोकलमध्ये सातशे प्रवाशी यानुसार दिवसाला ९.६ लाख प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
मुंबई, दि. २९ ऑक्टोबर : लॉकडाऊन नंतर हळूहळू पूर्वपदावर येणारी मुंबई दैनंदिनी आता आणखी वेगाने करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सरकारने आता मुंबई लोकलची सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु केली आहे. त्यातच आता सर्वसामान्यांनाही लोकलच्या प्रवासाची परवानगी द्यावी म्हणून राज्य सरकारने रेल्वेकडे मागणी केली करण्यात येत आहे. मात्र या मागणीला मध्य रेल्वेकडून उत्तर आले आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेने म्हटले आहे की, कोरोनाच्या आधी प्रत्येक दिवसाला ३५ लाख प्रवासी हे पश्चिम रेल्वेवर प्रवास करायचे, मात्र आता एका लोकलमध्ये सातशे प्रवाशी यानुसार दिवसाला ९.६ लाख प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. यामुळे सर्वांसाठी लोकल सुरू करायचे असल्यास आधी तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीचे विभाजन करण्यासाठी एखादा उपाय शोधावा, ज्याप्रमाणे पश्चिम बंगाल राज्यसरकारने शोधला आहे त्याप्रमाणे, महाराष्ट्र सरकार देखील विचार करत आहे, असे आधी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले होते. या तांत्रिक रुपयासाठी जी मदत लागेल ती करण्यास रेल्वे तयार आहे, असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.