देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती.
मुंबई, दि. ०४ नोव्हेंबर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कोरोनामुक्त झाले आहेत.फडणवीस यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.देवेंद्र फडणवीस यांना पुढचे १० दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.याबाबत खुद्द फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती. देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही 93 पर्यंत खाली घसरल्यामुळे गेल्या आठवड्यात त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग झाल्यास आपण सरकारी रुग्णालयांत उपचार घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर फडणवीस हे मुंबईच्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल झाले.