IMG-LOGO
राष्ट्रीय

रिलायन्स-फ्युचर ग्रुपच्या त्या करारावर अमेझॉनने फिरविले पाणी

Monday, Oct 26
IMG

रिलायन्स आणि फ्युचर समूहामधील हा व्यवहार जवळजवळ २५ हजार कोटींचा आहे. अॅमेझॉनने फ्युचर कूपन या कंपनीला एक कायदेशीर नोटीस पाठवली होती.

मुंबई, दि. २६ ऑक्टोबर  : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलला जोरदार झटका बसला आहे. रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुपसोबत केलेल्या करारावर सिंगापूरमधील लवादने बंदी घातली आहे. रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुपचा व्यवसाय खरेदी केल्यानंतर जेफ बेजोस यांच्या अमेझॉन कंपनीच्या याचिकेवर लवादने हा निर्णय दिला आहे.रिलायन्स आणि फ्युचर समूहामधील हा व्यवहार जवळजवळ २५ हजार कोटींचा आहे. अॅमेझॉनने फ्युचर कूपन या कंपनीला एक कायदेशीर नोटीस पाठवली होती. यामध्ये रिलायन्स रिटेलबरोबर व्यवहार करुन फ्युचर समूहातील ही कंपनी अॅमेझॉनबरोबरच्या करारातील अटींचे उल्लंघन करत असल्याचे नमूद करण्यात आलं होतं. याचसंदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली होती. यावर दिलेल्या अंतरिम आदेशात फ्यूचर ग्रुपला आपला व्यवसाय रिलायन्सला विकता येणार नाही असं म्हटलं. सध्या या करारावर बंदी घालण्यात आली आहे.मात्र रिलायन्सने आपण ठरलेल्या वेळामध्येच हा व्यवहार पूर्ण करणार असल्याचे म्हटले आहे. तर अॅमेझॉनने या निर्णयाचे स्वागत केलं आहे. आम्ही या निर्णयावर संतुष्ट असून हा निर्णय आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे असंही म्हटलं आहे. दोन्ही कंपन्यांनी जर हा व्यवहार पुढे सुरु ठेवला तर आम्ही पुन्हा दाद मागू असंही कंपनीने म्हटलं आहे. 

Share: