मागील आठवड्यात अंखी दास यांची डाटा प्रायव्हसीच्या मुद्द्यावर संसदीय समितीने चौकशी केली होती. यावेळी त्यांची जवळपास २ तास कसून चौकशी करण्यात आली होती.
नवी दिल्ली, दि. २७ ऑक्टोबर : फेसबूक इंडियाची पब्लिक पॉलिसीच्या प्रमुख आंखी दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फेसबुकने याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी आंखी दास या डेटा सुरक्षा विधेयक 2019 संबधित संसदेने नियुक्त केलेल्या संयुक्त समितीसमोर हजर झाल्या होत्या. भाजप खासदार मिनाक्षी लेखी या समितीच्या अध्यक्ष आहेत.नुकतेच भारतात फेसबुकवर पक्षपाताचा आणि द्वेषपूर्ण भाषणांवर कारवाई न करण्याचा आरोप झाला होता. या वादानंतर अंखी दास यांचं नाव चांगलंच चर्चेत आलं. त्यांच्यावर भाजपशी लागेबांधे असल्याचाही आरोप झालाय.अंखी दास यांनी त्यांची फेसबुक आणि सरकारकडून झालेल्या चौकशीनंतर एक आठवड्याने राजीनामा दिलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर राजकीय पोस्टचं नियंत्रण कशाप्रकारे होते यावरुन फेसबुकवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. भारतात फेसबुकचे 300 मिलियन पेक्षा अधिक वापरकर्ते आहेत. मागील आठवड्यात अंखी दास यांची डाटा प्रायव्हसीच्या मुद्द्यावर संसदीय समितीने चौकशी केली होती. यावेळी त्यांची जवळपास २ तास कसून चौकशी करण्यात आली होती.