IMG-LOGO
राष्ट्रीय

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

Thursday, Oct 29
IMG

गेल्याच महिन्यात केशुभाई पटेल यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातून ते कसेबसे सावरत असतानाच सकाळी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गांधीनगर, दि. २९ ऑक्टोबर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचे श्वास घेतले. हृद्य विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. गेल्याच महिन्यात केशुभाई पटेल यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातून ते कसेबसे सावरत असतानाच सकाळी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.  केशुभाई पटेल हे दोनदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. मात्र एकदाही ते आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करू शकले नाही. २००१ साली त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यांच्या जागी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केशुभाई पटेल यांना त्यांचे राजकीय गुरु मानत. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर गुजरात सोडताना त्यांनी केशुभाईंबाबत गौरवोद्गार काढले होते. गुजरातची जबाबदारी केशुभाईंच्या खांद्यावर असल्यामुळे आपण निर्धास्त असल्याचं मोदी म्हणाले होते.

Share: