खरं म्हणजे ती जमीन महाराष्ट्राची आहे. ज्या राज्याची जमीन असते त्यावर पहिला अधिकार हा त्याच राज्याचा असतो. भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करतायत.
मुंबई, दि. ०३ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्रसरकार हस्तक्षेप करतेय हे निंदनीय आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रसरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मेट्रो कारशेडबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जोरदार टीका केली आहे. खरं म्हणजे ती जमीन महाराष्ट्राची आहे. ज्या राज्याची जमीन असते त्यावर पहिला अधिकार हा त्याच राज्याचा असतो. भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करतायत. जमीन महाराष्ट्राची आहे आणि ती विकास कामासाठी वापरली जातेय. या देशात केंद्र सरकार हळूहळू आणीबाणी आणतंय', असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केलाय. 'दरम्यान मंदिरांचे टाळे तोडण्याची भाषा मी कधीच ऐकलेली नाही. सत्ता नसल्यामुळे कदाचित त्यांना काहीच सुचत नाहीये. याचमुळे कदाचित ते बिचारे असे वागत असतील,' असा टोलाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लगावलाय.